परिचय
* जन्मतारीख : १ मार्च १९४६ * जन्मगाव : दुधगाव ( ता. मिरज, जि. सांगली ) * काव्यलेखन : १९६४ पासून काव्यलेखनास सुरुवात. आकाशवाणी, दूरदर्शन - मान्यताप्राप्त कवी. * आकाशवाणी : युववाणी, वाणी या कार्यक्रमांतून काव्यवाचन; मराठी सुगम संगीत, स्वरचित्र यांसारख्या कार्यक्रमांतून संगीतबद्ध रचनांचे सातत्याने प्रसारण. *दूरदर्शने : `आरोही' व इतर कार्यक्रमांतून संगीतबद्ध हिंदी गीतरचना प्रसारण. सुगम संगीत, शब्दांच्या पलीकडे यांसारख्या कार्यक्रमांतून संगीतबद्ध गीतांचे सातत्याने प्रसारण. * अनेक कविसंमेलने व मुशायरे यांतून सहभाग. * विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून कवितांचे व ग़ज़लांचे प्रकाशन. * महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर ( इंदोर, मध्यप्रदेश ) स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी ग़ज़लांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम. * `जखमा अशा सुगंधी' व `महफिल-ए-इलाही' या नावे स्वतंत्र मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम. * ग़ज़ल क्लिनिक: नवोदित मराठी कवींसाठी ग़ज़ल कार्यशाळा. * दूरदर्शन टेलिफिल्म व धारावाही मालिका गीतलेखन : मराठी धारावाही मालिका - मर्मबंध, सप्तरंग, नसते उद्योग, गणेश पुराण, राजा शिवछत्रपति. हिंदी टेलिफिल्म - सनक, आखरी इन्तजार. हिंदी धारावाही मालिका - एहसास अपने अपने, स्वामी समर्थ, पुलिस भी एक इन्सान है, चलो मंछिदर गोरख आयो * ध्वनिफिती : मराठी - एक जखम सुगंधी, शब्दसुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे ( ग़ज़ला व निवेदन ). हिंदी अलबम -हिंदी पॉंप गीते * संगितिका : हिंदी - सप्तस्वर, माया और साया, नीर क्षीर विवेक. मराठी - स्वप्न मिनीचे * नृत्यनाटय : हिंदी -नीर क्षीर विवेक. मराठी- मी कळी मला फुलायचे. ( वरील सर्व संगितिका व नृत्यनाटय `मनिषा नृत्यालय' द्वारा रंगमंचावर सादर. ) * राज्यस्तरीय
|